साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | देशातील चलनाबाबत अनेक घोषना होत आहे तर अनेक नोटा व नाणे देखील बाजारात बनावट स्वरूपात येत असल्याने ग्राहकांची मोठी तारांबळ उडत आहे. नुकतेच अहमदनगर शहरातील नगर पाथर्डी रस्त्यावरील एका हॉटेल मालकास एका ग्राहकाने दहा हजार रुपयांचे नाणे दिले. हे नाणे पाहताच हाॅटेल मालक थाेडे चक्रावले. त्यांनी हे नाणे निरखून पाहिल्यानंतर त्यांनी ते स्विकारले. या नाण्याची चर्चा नगर जिल्ह्यात पसरल्यानंतर हे नाणे पाहण्यासाठी हाॅटेलमध्ये गर्दी हाेऊ लागली आहे.
या नाण्याबाबत सुधीर वायकर म्हणाले चांदीच्या रंगाप्रमाणे चकाकणारे हे नाणे आहे. या नाण्याच्या एका बाजूला दहा हजार रुपयांचा आकडा आहे. दुसऱ्या बाजूला रवींद्रनाथ टागोर यांचे चित्र आहे. रवींद्रनाथ टागोर यांची 150 वी जन्म जयंती असे हिंदी आणि इंग्रजीत छापण्यात आले आहे. सन 1861 ते 2011 असा कालावधी या नाण्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्या छायाचित्राखाली छापण्यात आले आहे. हे नाणे खरे की खाेटे यामध्ये आम्ही पडलाे नाही. सणासुदीच्या काळात आपल्या घरी लक्ष्मी आली आहे असे मानून आम्ही हे नाणे स्विकारले आहे. हे नाणे पाण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेत आहे. आम्हांलाही या नाण्याचं कुतूहल वाटल्याने ते आम्ही स्विकारल्याचे सुधीर वायकर यांनी नमूद केले.