जळगाव (साक्षीदार न्युज ) ; – जळगाव रेल्वे मालधक्क्यावर मजुरी दरवाढ मिळत नसल्यामुळे तसेच सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष यांनी कामगारांवर केलेल्या अन्यायकारक आदेश विरोधात खान्देश रेल्वे मालका माथाडी कामगार संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मजुरी दरवाढ बाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आदेश देऊन सुद्धा रेल्वे मालक्यावर कामगारांना नवीन मजुरी दरवाढ नुसार भाव मिळत नाहीत. तसेच त्यांना वारंवार भाव वाढ बद्दल सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्या मार्फत केली जात नाही. या संघटनेच्या वतीने अगोदर सुद्धा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु सहाय्यक कामगार आयुक्त यांनी त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते की लवकरात लवकर कारवाई करू परंतु त्यांनी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही.
👉🏽 Want REAL Change in जळगाव ? Watch This Now
त्याचप्रमाण सहाय्यक कामगार आयुक्त यांनी टोळी क्र. ८ मुकादम नियुक्ती बाबत आदेश दिला होता. तो आदेश त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता कुठल्याही कामगारांना विचारात न घेता अशा व्यक्तीविरुद्ध दिला आहे की तो कामगारांना धमकवणे, कामगारांची फसवणूक करणे, कामगारांच्या खोट्यासह घेणे ही संपूर्ण बाब सहाय्यक कामगार आयुक्त यांना माहीत असून सुद्धा त्यांनी मुकादामाचा त्याच व्यक्तीला आदेश दिला. तो आदेश तात्काळ रद्द करावा.
आणि जिथपर्यंत भाव वाढ व मुकादामाचा आदेश रद्द करणे या दोन्ही मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे त्यांच्या अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी म्हटले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे सचिव विशाल सुरवाडे, संघटनेची सभासद राजू भाट, विकी माने, शांताराम गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.