सणासुदीचा हंगामात साखरेचे दर वाढणार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | जगभरातील अनेक देशात साखरेची मोठी मागणी असल्याने आता साखरेचे देखील दर वाढले आहे. जागतिक स्तरावर अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका अधिक तीव्र झाला आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, महागाईमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, साखरेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अन्न पदार्थांच्या किमतीत वाढ होत आहे.

- Advertisement -

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती गेल्या १३ वर्षातील सर्वोच्च आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारावरही दबाव येत आहे. फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या ताज्या अहवालानुसार जागतिक बाजारात साखरेच्या किमती सप्टेंबर महिन्यात उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्या साखरेला जवळपास १३ वर्षांतील उच्चांकी दर मिळाला आहे. जागतिक स्तरावर साखरेच्या किमती वाढवण्यात भारताचाही हातभार आहे.

एल निनोमुळे भारत आणि थायलंडमधील ऊस पिकांवर परिणाम झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम साखरेच्या दरावर दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कृषी एजन्सीने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात एकूणच अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. मात्र, इतरांपेक्षा साखरेचे दर वाढले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात साखर किंमत निर्देशांक ९.८ टक्क्यांनी वाढला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS