साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | आपल्या विविध स्टाईलने नेहमीच चर्चेत असलेले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा जगभरात मोठा चाहता वर्ग असून त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाटेल ते करायला तयार होतात. त्यांच्या दरबार, पेट्टा, 2.0, चंद्रमुखी, काला या सिनेमांनी सिनेसृष्टी गाजवली. तर 2023 मध्ये प्रदर्शित झालेला ‘जेलर’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींची कमाई केली.
आता रजनीकांत यांचा ‘कनगराज’ प्रदर्शनाच्या मार्गावर असून या सिनेमासाठी रजनीकांत यांनी बक्कळ मानधन घेतले आहे. त्यामुळे रजनीकांत आशियातील सर्वात हायेस्ट पेड अॅक्टर बनले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांच्याजवळ दोन नवीन प्रोजेक्ट आहेत. यापैकी एक लोकेश कनगराज यांच्यासोबत ‘थलाइवर 171’ हा सिनेमा करणार. या सिनेमासाठी रजनीकांत यांनी बक्कळ मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. अफवेनुसार या सिनेमासाठी 260-280 कोटी रुपये मानधन घेणार आहेत आणि जर ही अफवा खरी असेल तर रजनीकांत आशियातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरतील. रजनीने आशियाई यादीत अव्वल स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही त्याने जॅकी चेनच्या फीला मागे टाकत अव्वल स्थान गाठले होते.
‘थलायवर 171’ या सिनेमाची निर्मीती सन पिक्चर्सने केलेली आहे. त्यांनी रजनीकांत यांच्या जेलर सिनेमाचीही निर्मीती केली होती. ‘जेलर’ या सिनेमाने 225 च्या बजेटमध्ये 605 कोटींची कमाई केली होती. एवढेच नाही तर ओटीटीवरही त्याची जादू कायम होती.