back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी मला साथ द्या – धनंजय चौधरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रावेर (सुनील भोळे) : – रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला असून, गावागावात उमेदवार ग्रामस्थांशी संपर्क करत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आज (दि.९) रावेर तालुक्यातील गुलाबवाडी- मोहरव्हाल-ताड जिन्सी – विश्राम जिन्सी -आभोंडा बु-आभोंडा खु येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

- Advertisement -

Dhananjay Chaudhary

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून जिन्सी ते रसलपूर १४ किलोमीटर डांबरीकरण रस्ता, जिन्सी सांबरपाट रस्ता पूल तसेच गावाअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक अशी अनेक मुलभूत सुविधांची कामे झालेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या चौधरी परिवाराने जाती-पातीविरहित सर्वसमावेशक राजकारण करत लोकसेवक मधुकरराव चौधरी आ. शिरीष चौधरी यांनी या मतदारसंघाचा चौफेर विकास केला.

- Advertisement -

Dhananjay Chaudhary

गेल्या अडीच वर्षांत महायुतीच्या सरकारने अनेक कामाला स्थगिती दिल्यामुळे मतदारसंघाच्या विकासात खंड पडला आहे. मतदारसंघातील विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशीर्वाद द्यावे, अशी ग्रामस्थांना विनंती केली. यावेळी लक्ष्मण पवार गुलाब रामा गुरुजी लखु मेंबर नंदुलाल रोडू गोकुळ राठोड शंकर पवार हंसराज बाजीराव मोहरव्हाल सर्फराज तडवी उस्मान सरपंच जमीर तडवी मोहम्मद तडवी असलम तडवी इस्माईल तडवी कुर्बन तडवी महमूद तडवी गुलाब तडवी इमरान तडवी अकबर तडवी इमरान तडवी सुलेमान तडवी फकिरा तडवी छब्बिर तडवी नथ्ठू तडवी जयनुर तडवी बाई जोहरा बाई सरपंच हसीना तडवी ताड जिन्सी शेख सलीम युनूस तडवी सरपंच सरफराज तडवी हनिब पहिलवान फत्तु परशुराम पवार प्रताब राठोड सचिन पवार युनूस इस्माईल रहीम अय्युब सद्दल लुकमन बलदार विश्राम जिन्सी उपसरपंच सौजी अभिराम पवार छगन पवार अमरसिंग पवार अजमल पवार अजमल जवाहरलाल पवार उत्तम पवार किशोर पवार निलेश पवार शुभाष पवार उमराज पवार सुनील पवार करताल पवार अभोडा सरपंच अल्लुद्दिन तडवी गुळशर तडवी मज्जीत तडवी चांदखा तडवी शेख आरिफ इस्माईल पहेलवान बशीर तडवी सुलतान पठाण हुसेन तडवी सलीम तडवी अशरद तडवी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS