साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात छोट्या मोठ्या कारणाने हत्या करण्याचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांदुस गावात रात्रीच्या सुमारास आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तसेच जुना वाद असल्याने तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात तरुणाच्या पोटात गोळी लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील चांदुस गावात रात्रीच्यावेळी तरुणावर पोटात फायरिंग करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शुभम तांबे असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. परिसरातील वचर्स्व आणि जुन्या वादातुन तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. अचानक गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गोळीबारात जखमी तरुणावर पिपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असुन प्रकृती अस्थिर आहे. हा गोळीबार चांदुस येथील दोन तरुणांनी केल्याचा संशय राजगुरुनगर पोलीसांनी व्यक्त करत हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक तैनात केले आहे. या हल्ल्यामुळे तरुण वयात पिस्तुलांसारखं प्राणघातकी हत्यारे येतात तरी कुटुन असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.