Supriya Sule suspended ; लोकसभेतून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्याचे सत्र काही थांबन्यायाचे नाव घेत नाही काळ काही खासदारांना निलंबन केले होते आणि जा चक्क सुप्रिया निलंबित केले आहे .काल लोकसभेत एकूण ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते . आज पुन्हा एकदा विरोधकांच्या बाकावर बसलेले ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरुर यांचा देखील यात समावेश आहे.
विरोधकांनी प्रश्न विचारला होता कि देशभरात संसदेची सुरक्षा भेदल्याची घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घुसखोरीनंतर लोकसभेच्या कामकाजात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती . संसद सुरक्षेच्या प्रश्नावरुन आजही लोकसभेत मोठा गदारोळ बघायला मिळाला. ज्यानंतर पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
काल ३३ खासदारांचे निलंबन केल्यानंतरआमी आज पुन्हा एकदा तब्बल ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले . आज निलंबित केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरुर यांच्या नावाचा समावेश आहे.
इतिहासात आत्तापर्यंत एकूण १४१ खासदार निलंबित झाले आहे .
दरम्यान, याआधीही संसदेच्या कामकाजात गोंधळ घातल्या प्रकरणी १९ आणि त्यानंतर ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन झाल्याने कारवाईचा आकडा १४१ वर गेला आहे. देशाच्या इतिहासात लोकसभा आणि राज्यसभेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.