Suryamukhi Ganpati Temple | दुसखेड्यात सूर्यमुखी गणपती मंदिराचा प्रथम वर्धापन दिन भक्तिभावात; होमहवन, अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Suryamukhi Ganpati Temple यावल | साक्षीदार न्यूज |दुसखेडा येथील सूर्यमुखी गणपती मंदिर देवस्थानाचा प्रथम वर्धापन दिन मंगळवारी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अशोकभाई सोनवणे व त्यांच्या धर्मपत्नी अपर्णा सोनवणे यांच्या हस्ते, तसेच गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा, होमहवन व अभिषेक संपन्न झाला. पूजा विधी पुरोहित कल्पेश महाराज यांनी पार पाडले.

- Advertisement -

गावासाठी स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या सूर्यमुखी गणपती मंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री गणेशाचा प्रथम वर्धापन दिन विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवलिंगाचा अभिषेकही करण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अशोकभाई सोनवणे हे पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील माजी नगरसेवक असून दुसखेडा हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी यापूर्वीही गावासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मागील वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत गरीब कुटुंबातील कुमारी कोमल सपकाळे हिने गावातून द्वितीय क्रमांक मिळविल्यानंतर तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.

- Advertisement -

या वर्धापन दिनी दुर्वास सोनवणे, हरिपाठातील महिला मंडळ तसेच ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पारस सोनवणे व विशाल दांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Suryamukhi Ganpati Temple

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS