जळगावातून आयशर ट्रकची चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – आयशर चोरून पसार झालेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी छत्रपती संभाजी नगरातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव, छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राम नगर येथील रहिवाशी जावेद लतिफ पटेल (रा. रामनगर) यांच्या मालकीची आयशर क्रमांक (एमएच १९, सीवाय ४८४६ ) रामनगर परिसरात खासगी रूग्णालयात समोर पार्कींग लावलेली होती. त्यावेळी ८ सप्टेंबर २०२२ रोजी पार्कींगला लावलेली आयशर ट्रक चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चोरीला गेलेला ट्रक हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील समीर नसीर खान उर्फ पठाण याने चोरून नेल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयिताला अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, राहुल रगडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी कारवाई करत संशयित आरोपी याला समीर नसीर खान उर्फ पठाण याला छत्रपती संभाजी नगर येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे.

Eicher Truck Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS