चॉपर घेवून दहशत माजवित फरार झालेल्या संशयिताला तांबापूरा परिसरातून अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ६ डिसेंबर २०२४ ; –जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातील खदानीजवळ चॉपर घेवून दहशत माजवित फरार झालेला मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता तांबापूरा परिसरातून अटक केली आहे.

- Advertisement -

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातील खदानीजवळ रईस शेख रशीद रा. मच्छीबाजार व मोहम्मद शोएबशेख सलीम उर्फ रफत रा. बिलाल चौक हे दोघे हातात चॉपर घेवून परिसरात दहशत माजवित असल्याचा प्रकार २५ डिसेंबर रोजी घडला होता. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस दोघांना रंगेहाथ पकडण्यासाठी गेले. याठिकाणाहून रईस शेख रशिद याला चॉपरसह ताब्यात घेतले होते. मात्र त्याचा साथीदार मोहम्मद शोएब शेख हा पोलीसांना पाहून फरार झाला होता.

फरार झालेल्या मोहम्मद शेएब शेख याचा एमआयडीसी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. संशयित हा सोमवार ५ फेब्रुवारी रोजी तांबापूरा परिसरात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे यांचे पथकाने पहाटे ५ वाजेच्या सुमारास संशयित मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत याला अटक केली. रफत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याविरुद्ध चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS