जाफ्राबाद (साक्षीदार न्युज ) ; –आपल्या संतांचा वारसा नव्या पिढीमध्ये रुजविण्याची गरज असून, संताचे विचारच संस्कृती टिकवून ठेवू शकतात, असे प्रतिपादन हभप साक्षीताई अपार यांनी केले.
जाफराबाद तालुक्यातील शिवेश्वर संस्थान बोरगावबु-बोरी,-वाडी,बोरगाव मठ येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम व गाथा पारायण सोहळ्याचे मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताह प्रारंभ दि,०२/०३/२०२४ ला झाला असुन सांगता ही दि. ०९/०४/२०२४ ला भव्य महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दुसऱ्या किर्तन रुपी सेवा निमित्त, हभप साक्षीताई अपार यांचे किर्तन संपन्न झाले पुढे त्या म्हणाल्या,
काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती ||
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा हा अभंग घेऊन ,ज्याप्रमाणे आईशिवाय बापाची,सोनाराशिवाय सोन्याची, त्याचप्रमाणे संतांशिवाय देवाची ओळख होऊ शकत नाही.अनेकांना संत कळालेच नाहीत.जिथे संतांचे पाय असतात, तिथेच देव असतात.
यावेळी किर्तन श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते