साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यात मोठे आंदोलन सुरु होते. त्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी देखील घेतल्या आहे. पण आता भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा खुलासा केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले कि, मी 96 कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही, मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे आहेत, मी आयुष्यात कुठलाच कुणबी दाखला घेणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला. त्यामुळे मराठा समाजातील अंतर्गत द्वंद आगामी काळात समोर येण्याची चिन्हे दिसून येत आहे.
इस्त्रायल-हमास युद्धात भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केली. त्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टीका केली. त्याच टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज प्रत्युत्तर दिले. राणे म्हणाले की, तुष्टीकरणाचे राजकारण सोडून, देश प्रथम ही भूमिका शरद पवार कधी तरी घेणार आहेत की नाही? 1993 मधील मुंबईतील साखळी बॉम्फस्फोटात ज्या पद्धतीने पवारांनी 13 वा बॉम्फस्फोट मशिदीत झाला अशी खोटी माहिती पसरवली त्यातून ते आतंकवाद्यांची बाजू घेऊ इच्छित होते का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे अत्यंत चुकीचे आहेत. मुळात त्या ठिकाणी बॉम्फहल्ला झालाच नव्हता, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.