जळगाव ; – गेल्या महिन्यापूर्वी देखील महानगर पालिकेच्या डॉग व्हॅनला देखील एका डंपरने धडक दिल्यामुळे चक्क या डॉग व्हॅनचे दोन तुकडे झाले होते तरी देखील कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता या हायवेचे देखील खांब तुटलेले होते मात्र कुणीही याबद्दल गुन्हा दाखल केला नाही आणि आता शहरात वाळू घेऊन शनिपेठकडे येणाऱ्या ट्रॅक्टरने दूरध्वनीच्या खांबाला धडक दिल्याने खांब कोसळून ट्रॅक्टरही उलटले. यामुळे ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर व कडेला असलेल्या गटारीत पसरली होती. काही वेळाने डंपर मागवून त्यात ही वाळू भरुन नेण्यात आली. याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

विदगाव येथून तापी नदीपात्रासह खेडी, आव्हाणे येथून गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर ममुराबादकडून येणाऱ्या रस्त्यावरून चौगुले प्लॉट भागातून जळगाव शहराकडे येत असतांना सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता लाल रंगाचे एक ट्रॅक्टर ममुराबाद रस्त्याकडून येत असताना चौगुले प्लॉट कॉर्नरवर मोतीलाल भावलाल चौधरी यांच्या घराजवळ असलेल्या एका दूरध्वनीच्या खांबाला धडकले. त्यामुळे हा खांब कोसळला व ट्रॅक्टरही उलटले. त्यामुळे त्यातील वाळू रस्त्यावर व गटारीत पसरली. काही वेळाने डंपर मागवून त्यात वाळू भरून नेण्यात आली.