करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्यात प्रचार रॅलीला लाभला अभूतपूर्व प्रतिसाद; ठिकठिकाणी जंगी स्वागत

चाळीसगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून शनिवार, दि. ४ रोजी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या प्रचार रॅलींना सर्वच गावांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभून ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तर महिलांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तरुणांमध्ये एवढा उत्साह संचारला होता की, तरुणांनी चक्क करणदादा पाटील, खा. उन्मेषदादा पाटील यांना खांद्यावर घेत गावातून रॅली काढली.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा, भडगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव तालुका पिंजून काढला आहे. ते त्या-त्या तालुक्यातील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या साथीने गावा-गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्वतः करणदादा पाटील नागरिकांच्या भेटी घेत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

शनिवार, दि. ४ रोजी खा. उन्मेषदादा पाटील, माजी आ. राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या साथीने चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींना इतका अभूतपूर्व प्रतिसाद लाभला की, काही तरुण कार्यकर्त्यांनी करणदादा पाटील यांना चक्क खांद्यावर घेऊन प्रचार रॅली काढली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS