यावल दि.२१ ( सुरेश पाटील ) ; – तालुका होमगार्ड समावेशक भानुदास कवडीवाले नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम होमगार्ड दलातर्फे माजी तालुका समादेशक भगतसिंग पाटील शशिकांत फेगडे यांच्या खास उपस्थितीत व हस्ते करण्यात आला.
यावल पथकातील तालुका समादेशक अधिकारी भानुदास कवडीवाले हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांना माजी तालुका समादेशक भगतसिंग पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी माजी तालुका समादेशक शशिकांत फेगडे उपस्थित होते,त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम येथील पोलीस कवायत मैदानावर घेण्यात आला.कवडीवाले यावल पथकात १९८६ साली भरती झाले होते त्यांनी ३७ वर्ष ९ महिने अशी सेवा केली यावेळी माजी कंपनी नायक शशिकांत फेगडे यांचे भाषण झाले त्यांनी भाषणात सांगितले की भानुदास कवडीवाले यांच्या कार्यकाळात त्यांचा प्रवास होमगार्ड पासून ते समादेशक अधिकारी पदापर्यंत टप्प्या टप्प्याने झाला ते एकमेव होमगार्ड असे आहे की ते होमगार्ड पासुन समादेशक पदापर्यंत पोहोचले त्यांचे कार्यकाळात त्यांनी गडचिरोली ‘तेलंगणा,मध्यप्रदेश,महाराष्ट्र येथे कर्तव्य बजावलेले आहे त्यांना जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कबड्डी स्पर्धा प्रशंसा प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट होमगार्ड उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व कोरोना (कोविड ) 19 या काळात निष्काम सेवा बजावल्याने त्यांना जळगाव येथील एस.पी.साहेब यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला आहे आणि आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक बंदोबस्त मुंबई, ठाणे येथे सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिने आधी बंदोबस्ताला गेले असता तेथील SDPO यांनी सेवानिवृत्ती अवघी काही दिवसा वर असताना बंदोबस्ताला मुंबई येथे आले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता .तसेच त्यांना ५६ वा वर्धापन दिन कवायत प्रमाणपत्र मिळाले आहे यावेळी कार्यक्रमासाठी माजी तालुका समादेशक भगतसिंग पाटील यांनी भाषणात सांगितले की यावल होमगार्ड हे बंदोबस्त काळात शिस्तीने काम करत असतात व नवीन होमगार्ड यांनी पोलीस भरती.
अग्निशमन भरती,वनरक्षक भरती करिता प्रयत्न केले पाहिजे असे उद्गगार काढले तर आभार व प्रास्ताविक कॉटन मास्टर भगवान पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पाडणे कामी नव्याने प्रभारी समादेशक झालेले विजय जावरे, माजी पलटण नायक रमेश चौधरी माजी होमगार्ड अरुण काळे.शिवराम येईल असे व पथकातील सर्व पुरुष व महिला होमगार्ड यावेळी हजर होते.