Defence Forces | तांदुळवाडीत अभिमानाचा क्षण! पाच तरुणांची थेट संरक्षण दलात निवड, गावात जल्लोष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Defence Forces भडगाव | गोरख माळी | भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी घटना घडली असून, गावातील पाच तरुणांची विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाली आहे. देशसेवेची संधी मिळाल्याने संपूर्ण गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

निवड झालेल्या तरुणांमध्ये अनुज भैयासाहेब महाजन यांची Central Reserve Police Force (CRPF) मध्ये, नाना पवार यांची Central Industrial Security Force (CISF) मध्ये, तर अनुराग सुधीर पाटील आणि गौरव अनिल पाटील यांची Border Security Force (BSF) मध्ये निवड झाली आहे. तसेच अनंत तुकाराम मोरे यांची Indian Navy मध्ये निवड झाल्याने गावकऱ्यांचा अभिमान अधिकच वाढला आहे.

या यशानिमित्त गावातील ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या जवानांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान “जय हिंद”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या प्रसंगी अशोक परदेशी आणि प्रा. प्रशांत पाटील यांनी जवानांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

- Advertisement -

या तरुणांनी कठोर मेहनत, शिस्त आणि देशप्रेमाच्या जोरावर हे यश मिळवले असून, त्यांची कामगिरी इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. मिरवणुकीत तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Defence Forces

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS