साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक धक्कादायक घटना घडत असतात अशीच एक धककादायक घटना गुजरात राज्यातील सुरत येथे घडली आहे. एका शाळेतील शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका एका चार वर्षांच्या मुलीला 30 वेळा मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे.
यानंतर शाळेने कारवाई करत महिलेला निलंबित केलं. साधना निकेतन शाळेत ही घटना घडली. वर्गात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलीला मारहाण झाल्याचं फुटेज कैद झालं आहे.
સુરતની સાધના નિકેતન સ્કૂલની શિક્ષિકાની ક્રૂરતા…વિડિયો જોઈ તમારા પર રુવાંટા ઉભા થઈ જશે#Surat #School #Teacher@prafulpbjp pic.twitter.com/3uz2pRjSmH
— Jay Acharya ( VTV NEWS ) (@AcharyaJay22_17) October 11, 2023
शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. जशोदाबेन खोखरिया असं आरोपी महिलेचं नाव आहे. सहायक पोलीस आयुक्त विपुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. जशोदाबेन यांना भारतीय दंड संहिताच्या कलम 323 आणि बाल न्याय कायदा 2015 च्या संबंधित कलमांनुसार अटक करण्यात आली.