Crime News : साक्षीदार न्युज ; – बदलापूरची घटना ताजी असतांनाच अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा भागातील एका सेवाभावी संस्थेची सुरु असलेल्या शाळेत एक अत्याचाराची घटना घडली आहे . या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत येथील शिक्षक अश्लील चाळे करत असल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकी पेशाला कलंक लागेल असे कृत्य याने केले आहे. यामुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.
👉🏽 मोठी बातमी ; जळगावचा RTO अधिकारी ACB च्या जाळ्यात
या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नराधम शिक्षकेला बेड्या ठोकल्या आहेत. वांद्रापाडा परिसरातील संस्थेच्या शाळेत हा सर्व प्रकार सुरू होता. पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओही तो काढत होता. शिक्षक या मुलांना फसवत होता. ह्या झालेल्या प्रकारामुळे शाळेती घाबरलेली मुले आता शाळेत जाण्यासाठी पालकांना नकार देत आहे .
या घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पालकांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली. अंबरनाथ पोलिसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्या शिक्षकाला अटक केली.
आज त्या नराधम शिक्षकाला उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे . बदलापूरमध्ये देखील काही महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला होता. या घटनेनंतर देखील शाळेत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेचे प्रकार कमी होण्यास तयार नाही उलट हे असे प्रकार शाळेमध्ये वारंवार घडतच आहे त्यामुळे पालकांमध्ये एक घाबराटीचे वातारण आहे .