Telangana Municipal Election | EVM बाजूला, बॅलेट पेपरवर मतदान… तेलंगणात काँग्रेसची सुनामी, भाजपला मोठा धक्का!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Telangana Municipal Election | साक्षीदार न्यूज | ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात असताना कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर तेलंगणामधील 116 नगरपालिका आणि 7 महानगरपालिकांतील एकूण 2,996 वॉर्डांसाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान पार पडले. या निवडणुकांचे निकाल अत्यंत धक्कादायक ठरले असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे भाजपला मोठा फटका बसल्याचे चित्र दिसून आले आहे.

तेलंगणात काँग्रेसचा प्रभाव कायम

तेलंगणातील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने 1,537 प्रभाग जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

- Advertisement -

ए. रेवंत रेड्डी यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, राज्य सरकार प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहे आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय दिला जाईल.

इतर पक्षांची कामगिरी

या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती (BRS) ने 781 प्रभागांमध्ये विजय मिळवला.
भारतीय जनता पक्ष (भाजप) ला 336 प्रभागांवर समाधान मानावे लागले.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने 70 प्रभाग जिंकले.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) (CPI-M) ला 13 प्रभाग मिळाले.

इतर पक्षांना 73 तर अपक्ष उमेदवारांना 183 प्रभागांमध्ये यश मिळाले.

एकूण निकाल (प्रभागनिहाय)

  • काँग्रेस: 1,537

  • BRS: 781

  • भाजप: 336

  • AIMIM: 70

  • CPI (मार्क्सवादी): 13

  • इतर: 73

  • अपक्ष: 183

तेलंगणात दोन वर्षांपूर्वी सत्तेत परतलेल्या काँग्रेसने या निकालांद्वारे आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

“लाच प्रकरणानंतर 24 तासातच जळगावात वाळू माफियांचा कहर! 57 वर्षीय नागरिकाचा डंपरखाली

Telangana Municipal Election

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kharat of Jalgaon | नाशिकच्या खरातनंतर आता ‘जळगावचा खरात’...

Kharat of Jalgaon साक्षीदार न्यूज । सुनिल भोळे । देशात सध्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या भोंदू बाबामुळे...

RTO Auto Ricksha | ८ एप्रिलला जळगाव आरटीओवर ऑटोचालकांचा...

RTO Auto Ricksha जळगाव | साक्षीदार न्यूज | राज्यातील ऑटो रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ८ एप्रिल रोजी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर...

Jal Jeevan Mission | दहिगाव जलजीवन योजनेवर संशयाची सावली;...

Jal Jeevan Mission  यावल | मिलिंद जंजाळे  | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे येत...

RECENT NEWS