दहा हाजार समाज बांधव मंगळवारी Jalgaon जळगाव येथे जाणार : सोनवणे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची बैठक जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली.

- Advertisement -

यावेळी आदिवासी कोळी समाजाला जो पर्यत सरसकट जात प्रमाणपत्र मिळत नाही तो लढाई चालु ठेवण्याचा निर्धार आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची तयारी करणे व नियोजन बाबत बैठक घेवून चर्चा करण्यात आली. यावेळी जितेद्र सपकाळे ,यंशवत शेठ पहेलवान,आत्मराम कोळी, नामदेव कोळी ,राहुल तायडे ,नंदुभाऊ सोनवणे सह यावल तालुक्यातील विविध संघटनाचे प्रतिनिधी,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी जळगाव येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण रावेर तालुका मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले, तसेच या उपोषणासाठी रावेर तालुक्यातील महीला,तरुण, विवीध संस्था / संघटना पदाधिकारी, विदयार्थी, यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले .

सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे , Jalgaon जळगाव येथे जात पडताळणी समिती कायमस्वरूपी जळगाव येथे यावी ,इतर समाजाप्रमाणे आदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहिल आंदोलना सदर्भात यावल तालुक्यातुन प्रत्येक गावातुन किमान १० -१५ लोक स्वखर्चाने जाणार असुन मुलां बाळांसहित काही परिवार तसेच शाळेकरी विद्यार्थी / विद्यार्थीनी तसेच कर्मचारी वर्ग सुद्धा जासतीत संख्यने जाणार आहे.हे कोळी जमातीचे शेवटचे आरपार चे आमरण उपोषण असेल. आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षानी फक्त समाजाचा वापर केला पण आता नाही . ही लढाई कोण्या पक्षाची व एका संघटनेची नसुन सर्व पक्षीय ,संघटनेची व समाज बाधवानची आहे.असे प्रभाकर आप्पा यांनी सांगितले सूत्रसंचालन प्रमोद कोळी यांनी तर आभार खेमंचद कोळी यांनी केले.

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS