साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील एका जणाने धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण होऊन नागरिक संतप्त होत एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी वेळीच संबंधिताला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा परिसरातील एका जणाने धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर तांबापुरा परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यामुळे रविवारी रात्री काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमाव पोहोचला व कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच संबंधित तरुणाला ताब्यात घेतले व कारवाई सुरू केली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.