साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना आता कोल्हापूर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली असून गोव्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स बस शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून वारणा नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आलं आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अपघातग्रस्त बस १५ ते २० प्रवाशांना घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होती.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी – आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूडच्या असणाऱ्या पुलावर आली असता, पहाटे सहा वाजेच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स थेट वारणा नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या अपघातात प्रवाशांना दुखापत झाली नाही.