साक्षीदार |१७ ऑक्टोबर २०२३ | अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नंदुरबार जिल्ह्यातील देखील भरधाव ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात दोघे ठार झाले तर तिसरा गंभीर जखमी झाला. नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक 16 रोजी सरपणी नदीच्या पुलाजवळ हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटारसायकलीची सोमवारी दुपारी समोरासमोर धडक झाल्यानंतर या अपघातात एक युवकाचा ट्रकचा मागच्या चाकात अडकल्याने जागीच मृत्यू झाला तर दुसरा सहकारी ट्रकच्या पुढील चाकात आल्याने गंभीर जखमी झाला व तिसरा सहकारी अपघातात मयत झाला. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिका नसल्याने खाजगी वाहनांने रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली. विसरवाडी पोलिसांनी अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्त युवकांना स्थानिकाच्या मदतीने खाजगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात नवापूर तालुक्यातील दापूर उची मौली येथील सुनील वसंत गावीत या युवकाचा जागीच मृत्यू झाला . दुसर्या युवकाचा विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झाला. त्याची ओळख पटली नसून तिसरा युवकदेखील गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.