पाचोऱ्यात भीषण अपघात : १ ठार तर तीन जखमी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूलावर कार व मोटारसायकल यांच्यात धडक झाल्याने मोटारसायकल स्वार जागेवर ठार झाला तर चारचाकीतील दोघे जण आणि मोटारसायकल वरील मागील युवक गंभीर झाल्याची घटना ऐन दसऱ्याचे दिवशी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे श्रीकृष्ण नगर परीसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान जळगाव चौफुली जवळील श्रीकृष्ण नगर परीसरातील रहिवासी असलेले भुषण संतोष हटकर (वय – २०) व प्रविण नाना हटकर (वय – २२) हे दोघे मित्र मोटरसायकल (पल्सर) एम. एच. १९ – ई. डी. २१९६ वरुन घरी जात होते. दरम्यान जारगाव चौफुली कडून एम. एच. १५ – बी. एन. १०३५ मधील दोघेजण भडगाव रोडकडे जात असतांना दोन्ही वाहने एकमेकांवर आदळले यात मोटारसायकल स्वार भुषण संतोष हटकर हा जागेवर ठार झाला तर त्याचे मागे बसलेला प्रविण नाना हटकर याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. व चार चाकी वाहनातील देशमुखवाडी परीसरातील दोघ इसम गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मयत भुषण संतोष हटकर हा खाजगी व्यक्तीकडे सेंडीग कामावर मजूरी करत होता त्याचे पाच्छात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे, तर जखमी प्रविण नाना हटकर हा आई वडीलास एकुलता एक मुलगा असून तो बाजार समितीत हमाली काम करतो. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS