जामनेरजवळ भीषण अपघात : मुख्यध्यापकासह दोन ठार तर तीन जखमी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर अपघात होत असतांना एक भीषण अपघात जामनेर- बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीनजीक शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झाला आहे. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने विचित्र अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने निघाले होते. त्याच्यामागे ईश्वर पारधी हेही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते. मालदाभाडीनजीक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला. यामुळे दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. या भीषण घटनेनंतर अपघातातील एका दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली.

याचवेळी चारचाकी वाहनावरील चालकाचेदेखील नियंत्रण सुटल्याने तीही रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली. यात चारचाकीतील तीन जण जखमी झाले आहेत. ते पुण्याहून घाणखेडकडे (ता. बोदवड) निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच जामनेर येथून जालमसिंग राजपूत रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहोचले. मालदाभाडी, नवीदाभाडी व वाडीकिल्ला येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले. तीनही मृतदेह रात्री जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी नातेवाइकांनी गर्दी केली होती. जामनेर येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला जि. प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (वय ४२), सुनील शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS