Samriddhi Highway accident ; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : १२ ठार तर २० जखमी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती संभाजीनगर जवळच्या समृद्धी महामार्गावर ट्रक व मिनीबसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान बालकाचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

Samriddhi Highway accident मध्यरात्री झालेल्या या अपघातामध्ये ठार झालेल्या 12 जणांपैकी राजीव नगर वसाहतीमधील चौघांचा समावेश आहे. त्यात एकाच घरातील तिघांचा समावेश आहे. झुंबर काशिनाथ गांगुर्डे व 58 वर्ष, अमोल झुंबर गांगुर्डे वय 18 वर्षे, सारिका झुंबर गांगुर्डे वय 40 वर्ष राहणार राजू नगर नाशिक अशी एका कुटूंबातील मृतांची नावे आहेत. तर या अपघातामध्ये एका लहान मुलाने आपले आई-वडील गमावले. तो रडून रडून आई-वडिलांना बोलवत होता. या लहान मुलाची बिकट स्थिती झाली होती.

समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर तत्काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने मदतकार्य सुरु केले. रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

Samriddhi Highway accident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS