साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | देशातील प्रत्येक नागरीकासाठी रेल्वेचा प्रवास सुखरूप मानला जात असतो पण गेल्या वर्षभरापासून रेल्वेच्या अपघाताची संख्या वाढल्याने आता मोठ टेन्शन वाढले आहे. बुधवारी मध्यरात्री बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 200 प्रवाशी जखमी झाले आहेत. दिल्लीहून कामाख्याला (गुवाहाटी) जात असलेल्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला.
एक्सप्रेसचे 21 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. अपघातानंतर या ठिकाणी बचावकार्य सुरू असून ते अद्यापही सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वेचे कर्माचारी घटनास्थळी दाखल झाले. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डीडीयू-पटना रेलखंडच्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, अपघात का झाला याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.