Terrorist Attack In Jammu And Kashmir | जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादि हल्ल्या अधिकाऱ्यासह चार जवान शहीद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Terrorist Attack In Jammu And Kashmir  जम्मू (साक्षीदार न्युज) ; – डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद झाले आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत आहे. सुरक्षा दलांनी एक किंवा दोन दहशतवाद्यांना घेरले आहे . अंधाराचा आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून थांबविण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला घेरलेला आहे आणि कडक बंदोबस्त ठेवन्याय आला आहे .

- Advertisement -

कठुआ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांचे पथक जम्मू प्रदेशातील विविध भागात शोध मोहीम सुरूच आहे . या संदर्भात डोडाच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार केला. त्या प्रत्युत्तराच्या कारवाईने चकमक सुरू झाली आहे.

याबाबत अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे 7.45 वाजता देसा वनक्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमक सुरू झाली. जम्मू विभागाला दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. गेल्या 35 दिवसांत डोडा भागातील ही चौथी चकमक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोडा जंगलात दहशतवाद्यांचा एक गट लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यावर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसओजी) आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम राबवली आणि त्याचदरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये आठवडाभरातील ही चौथी चकमक आहे. या ऑपरेशनला ऑपरेशन कोठी असे नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

अतिरिक्त सुरक्षा दल तैनात
20 मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या गोळीबारात सुरुवातीला एक अधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्यासह लष्कराचे चार जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराने सांगितले की, या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून शेवटचे वृत्त येईपर्यंत कारवाई सुरूच होती.

जम्मू भागात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ
अलीकडच्या काळात जम्मू भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. विशेषत: पूंछ, दोडा, राजौरी आणि रियासी सारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. दुसरीकडे, सुरक्षा दलांची दिशाभूल करण्यासाठी दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रेही आहेत.

सुरक्षा दलांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे
जम्मू विभागात सध्या 50 दहशतवादी सक्रिय आहेत. यातील बहुतांश दहशतवादी परदेशी म्हणजेच पाकिस्तानी आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी लष्कर, CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त पथके जम्मू विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत. पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याच्या नापाक कारस्थानांपासून परावृत्त होत नाही.

पाकिस्तान दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे
आंतरराष्ट्रीय सीमेवरून (आयबी) किंवा नियंत्रण रेषेवरून (एलओसी) दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा तो सातत्याने कट रचत आहे. यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड सक्रिय केले आहेत.

Terrorist Attack In Jammu And Kashmir

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS