साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच राज्यातील शिर्डी याठिकाणी येवून गेले, यावेळी त्यांनी सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका देखील केली होती. आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे पवारांच्या मदतीला धावून येत पंतप्रधानांनाच सवाल केला आहे. मुंबईत ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्याल संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काल परवा पंतप्रधान शिर्डीत येऊन गेले पण अजित पवार भाजपसोबत जाण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप काय होते? तर त्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला. त्यानंतर परवा आले तेव्हा बाजूला अजित पवार बसले होते. तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा गायब! कारण करणार कोणावर आरोप ते तर बाजुलाच बसले आहेत”
मग काय तर शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं? असा प्रश्न केला. पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं हे शेतकरी आणि शरद पवार बघतील. पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं? उत्तरेतील शेतकरी वर्षभर रस्त्यावर थंडी, वारा पावसात का बसले होते? का त्यांचे जीव घालवलेत तुम्ही? त्यानंतर तो काळा कायदा मागे का घेतला?