back to top
शुक्रवार, फेब्रुवारी 6, 2026

ठाकरेंच्या पक्षाला मिळणार बळकटी : ६ नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून नुकतेच पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीत ६ नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नव्या कार्यकारिणी विस्तारात खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी, यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कार्यकारिणी विस्तारात पक्षाचे उपनेते आणि संघटक पदीसुद्धा नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

उपनेते म्हणून विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव म्हणून सरदेसाई साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर काम पाहणार आहे. तर संघटक म्हणून अस्मिता गायकवाड (सोलापूर) शुभांगी पाटील (नाशिक) जान्हवी सावंत (कोकण) छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या नियुक्तीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेमंडळीमध्ये एकूण १६ जणांचा समावेश असणार आहे.

- Advertisement -

यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश असेल, असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS