वरणगाव ;- धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- Advertisement -
पंकज कडू (भगत ) माळी (३२ ) असे मयत तरुणाचे नाव असून तो दि ९ मंगळवारच्या रात्री घरात कोणास काही न सांगता घरातून बाहेर पडला होता बराच वेळ झाला तरी घरी परत आला नसल्याने घराच्या नातेवाईकांनी त्याला शोधले मात्र दिसुन आला नाही रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर सकाळच्या सुमारास जात असताना वरणगाव रेल्वे स्टेशनच्या थोड्याच अंतरावर रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळला या बाबत लोहमार्ग पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे
- Advertisement -