साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | जगभरातील चित्रपटसृष्टीतून गेल्या काही महिन्यापासून एकापाठो पाठ धक्कादायक घटना घडत असून यात अनेकांचे दु:खद निधनाच्या देखील बातम्या समोर येत असतांना नुकतेच बांग्लादेश चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमीसमोर आली आहे. दि.२ नोव्हेबर रोजी अभिनेत्री हुमैरा हिमू हिचा वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाले असून हुमैरा हिमूची तब्येत अचानक खालावली, त्यानंतर तिला तात्काळ बांग्लादेशची राजधानी ढाका येथील ‘उत्तरा मॉडर्न मेडिकल कॉलेज’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अभिनेत्री हुमैरा हिमूने २००६ मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ती अनेक बांगलादेशी मालिकांमध्येही दिसली आहे. ‘छायाबिती’ या टीव्ही मालिकेतून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीने मोरशेदुल इस्लामच्या ‘अमर बंधू रशीद’ चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप आवडला होता.