साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३: बॉलिवूड क्षेत्रातील अनेक अभिनेते व अभिनेत्री सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात. त्यात असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसुद्धा नेहमीच आपल्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत येत असते. आज देखील अशाच एका घटनेनेमुळे चर्चेत आली आहे. कारण अभिनेत्री कंगना रणौतच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. तिचा भाऊ अक्षत रणौतला मुलगा झाला आहे. यानिमित्त कंगनाने संपूर्ण कुटुंबासोबत आणि बाळासोबतचे छान क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामध्ये तिच्या आईच्या चेहऱ्यावर आजीचा झाल्याचा विशेष आनंद दिसतोय. तर कंगना आणि रंगोलीही आत्या झाल्याने त्यांचाही आनंद गगनात मावेना झालाय. दरम्यान कंगनाने आपल्या भाच्याचं ठेवलेलं नाव ऐकून सर्वच आश्चर्यचकित झालेत.
कंगनाने बाळासोबतचे फोटो शेअर करत लिहिले, ‘आजच्या शुभदिनी आमच्या कुटुंबात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. माझा भाऊ अक्षत रणौत आणि त्याची पत्नी रितू यांनी मुलाला जन्म दिला. या तेजस्वी आणि मनमोहक मुलाचं नाव आम्ही ‘अश्वत्थामा रणौत’ ठेवलं आहे. आमच्या कुटुंबातील या नवीन सदस्याला तुम्हीही आशिर्वाद द्या. आमचा आनंद आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आम्ही तुमचे आभारी आहोत.’