साक्षीदार न्युज । जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वयीका श्रीमती रजनी पाठक,तसेच शालेय पदाधिकारी व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा साकार केलेल्या इयत्ता 6 वी तुकडी क व इयत्ता 8 वी तुकडी अ मधील विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता,राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन तसेच माल्ल्यारपण करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्रीमती रजनी पाठक,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री.संजय भारुळे ,पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप,श्री.संजय वानखेडे जेष्ठ शिक्षिका सौ.विनया झाडगावकर ,सौ.मंगला भारुळे ,वर्गशिक्षिका सौ.रेखा पाटील ,श्री.योगेश सोनजे उपस्थित होते.या वेळेस साप्ताहिक शालेय परिपाठातील सहभागी विद्यार्थ्यानी गणपती स्तोत्र,सुविचार,दिनविशेष,बातम्या,बोधकथा,विज्ञान शाखा,पशू पक्ष्याचे आयुर्मान,आरोग्यासाठी चांगल्या सवयी,सूर्यनमस्कार माहिती व प्रात्यक्षिक,सवाद्य गितगायन सादर केले.अक्षरा सोनार ,विराज घाडगे,कृष्णा तांबट,कुणाल सोनवणे,जयेश लोहार,भाग्यश्री जगताप,या विद्यार्थिनी ने राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार व स्वराज्य स्थापनेबाबत जीवन कार्याची माहिती व पोवाळा तर प्रथमेश माळी ध्रुव वाघ,सचिन पंडित,केतन कपाटे या विद्यार्थ्याने युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या हिंदू धर्म प्रचार व प्रसार कार्याची माहिती दिली.
या प्रसंगी परिपाठावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशा नेहेते सूत्रसंचालन कार्तिक खैरनार,विनय पाटील,रेणुका जोशी यांनी केले.तर आभाप्रदर्शन कृष्णा पाटील,जयेश जैनकार यांनी केले शिक्षक श्री.मयूर पाटील यांनी सुरेल आवाजात जिजाऊ वंदना सादर केली.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण गोपाळ,चेतन महाजन,प्रणव श्रावगी, उमेर पिंजारी,तेजस ढाके,जयेश चौधरी,कृतिका ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमने करण्यात आली.