साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असल्याने अनेक बहिणी आपल्या माहेरी येत असतात, त्यामुळे भाऊबीजसाठी बहिणीला घ्यायला गेलेल्या भावाचा अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. यामुळे भाऊबीजच्या दिवशीच भावाला गमावल्याचे दुःख बहिणीवर ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण रोडवरच्या कांचनवाडी परिसरात हा अपघात झाला आहे. संभाजीनगरातील कांचनवाडी परिसरात राहत असलेल्या बहिणीला भाऊबीजेसाठी घेऊन जाण्यासाठी केशव विठ्ठल भिसे (वय २३) आणि सुरेश परदेशी गुरुजी (वय ७५, रा. बालम टाकली) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीने संभाजीनगर शहरात येत असताना टँकर व २ दुचाकीचा अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.