साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | प्रत्येक परिवारातील भावांचे नेहमीच भांडण नेहमीच होत असते पण काही वेळेनंतर हे भांडण मिटत असते पण नाशिकमध्ये भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीये. नाशिकच्या मनमाडमध्ये चुलत भावानेच आपल्या भावाच खून केलाय. नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथे ही घटना घडलीये. या खूनाचा पोलिसांनी २४ तासात छडा लावत दोघांना ताब्यात घेतलंय. यात ज्ञानेश्वर जनार्दन ह्याळीज असं मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सातत्याने त्याचा चुलत भाऊ भाऊसाहेब ह्याळीजच्या कुटूंबावर दादागिरी करत होता. त्याची नजरही संशयास्पद होती. जाणून बूजून त्रास देणे,अपमान करणे या रागातून चुलत भाऊ भाऊससाहेब व त्याचा मित्र महेश यांनी ज्ञानेश्वरला जंगलात नेलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. मारहाण झाल्याने ज्ञानेश्वर अत्यवस्थ अवस्थेत तेथेच पडला होता. नातेवाईकांना याची माहिती मिळताच नातेवाईकांनी दवाखान्यात त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मालेगाव पोलिसांनी सुरवातील अकस्मात मृत्यृची नोंद केली होती. पोलिसांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पुन्हा तपास सुरु केला. यावेळी गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता त्यांनी भाऊसाहेब व महेश यास ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यावेळी आपणच धारदार हत्याराने खून केल्याचे भाऊसाहेबने पोलिसांना सांगितले.