साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | धरणगाव- नांदेड- बसचा दुचाकीला कट लागल्याने बस गावात आल्यानंतर दोघांनी बसचालकास लाथाबुक्क्यांसह चापटांनी बेदम मारहाण केल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी नांदेड येथे गावठाण चौकात घडली. दरम्यान बसचालकांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून नांदेडला सायंकाळी येणारी चार वाजेच्या सुमारास येणारी बस क्र एम.एच.१४ बीटी -३०१९ ही नांदेडला आल्यानंतर नारणे गावाकडे जाते. ही बस नारण्याहून नांदेडकडे येत असतांना नम्रता महेंद्र पाटील (वय २०) रा. नांदेड हीच्या दुचाकीला बसने कट मारल्याने स्कुटी एमएच १९ ईसी ४१४४ घसरली व नम्रता पाटील हिच्या पायाला दुखापत झाली. बस गावात आल्यानंतर मुलीचे वडील महेंद्र पाटील व भाऊ तेजस पाटील यांनी बसचालक तुकाराम आनंदा रायसींगे (वय ४५) रा. बांभोरी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत बसचालक गंभीर झालाअसून साडेचार वाजेपासून सायंकाळच्या साडेसहा वाजेपर्यत तुकाराम रायसींग हे बसच्या सिटवर पडून होते. दरम्यान ही घटना नांदेड येथील रहिवाशी व गोंदीया पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाणे हे गावी सुटीवर आलेले असल्याने त्यांना समजताच त्यांनी स्वःताच्या वाहनामध्ये बसचालकास धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असून तेथे बस चालकावर उपचार सुरु आहेत. त्यानंतर घटनास्थळी एएसआय करीम सैयद यांच्यासह पोलिसांनी भेट देवून चौकशी केली. याघटनेनंतर नम्रता पाटील हिने धरणगाव पो.स्टे.ला बस चालक विरोधात फिर्याद दिली आहे.