साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३
राज्यातील गुन्हेगारी सातत्याने वाढ होत असतांना परिवारात देखील आता गुन्ह्याच्या घटना वाढत आहे. नुकतेच जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद येथे तरुणाने आपल्या जन्मदात्या आई वडिलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी आमसिद्ध रामू यरनाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद रामू मल्लाप्पा यरनाळ यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी आमसिद्धने वडील रामू यरनाळ व आई ललिता यांच्याकडे माझे लग्न तुम्ही लावून द्या असे म्हणत वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. यानंतर रागात आमसिद्धने वडील रामू यरनाळ यांच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातला. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर भावास ही धमकी देत लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे. आई ललिता यास ही मारहाण केली आहे. याघटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.