back to top
रविवार, जुलै 6, 2025

Dindi Balwarkaryanchi | बालरंगभूमी परिषदेची ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ भक्तीमय वातावरणात संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dindi Balwarkaryanchi साक्षीदार न्यूज | जळगाव | शहरातील बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने कै.गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिराच्या सहकार्याने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकऱ्यांची’ या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात ४०० विद्यार्थी – विद्यार्थिंनींनींसह त्यांचे शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -

सोहळ्याच्या सुरुवातीला केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कै.परशुराम विठोबा प्राथ. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. विठ्ठल रखुमाई तसेच विविध संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी – विद्यार्थिंनी सहभागी झाले होते. त्यांच्यासह पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांचे नृत्य लेझीम, टाळ नृत्य परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. या सोहळ्यातील नृत्य दिग्दर्शन शिक्षक योगेश भालेराव यांचे होते. बालरंगभूमी परिषदेचे गायक दिपक महाजन, सचिन महाजन व त्यांना संबळवर साथ करणारे अवधूत दलाल यांनी पालखी सोहळ्याची रंगत वाढवली. सुमारे तीन किलोमीटरची वाटचाल करत प्रभात कॉलनीतील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.यावेळी वारकरी संप्रदायातील संतांची माहिती बालकांना व्हावी म्हणून संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.

पालखी सोहळ्याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, हर्षल पवार, मोहित पाटील, डॉ.श्रध्दा पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका धनश्री फालक , उपशिक्षक कल्पना तायडे, सूर्यकांत पाटील, योगेश भालेराव, भावना धांडे, सीमा गोडसे, स्वाती पाटील, योगेश पाटील, दिपक पाटील, चारुलता भारंबे, मीनाक्षी इसे, गायत्री पवार, उज्वला वाशिमकर आदी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पालखी व दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कै.गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिराचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Dindi Balwarkaryanchi

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Khandesh Educational | खान्देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २५० पाल्यांचा शैक्षणिक...

Khandesh Educational  साक्षीदार न्यूज | जळगाव येथील भरारी फाउंडेशन , वेगा केमिकल्स प्रा.लि. जळगांव व रोटरी क्लब जळगाव मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात...

Insurance Yojana | बँक खात्यात पैसे नाही , तरीही...

Insurance Yojana | साक्षीदार न्यूज  | सरकारने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) ही एक क्रांतिकारी योजना आहे, जी बँक...

Indian Railways | भारतीय रेल्वेत मोठे बदल: तात्काळ तिकीट,...

Indian Railways साक्षीदार न्यूज | उद्या, १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल लागू करणार आहे....

RECENT NEWS