महिला उमेदवाराच्या नेतृत्वात शहराला परिवर्तनाची आशा : जयश्रीताई महाजन यांनी केला थेट जनसंवाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (साक्षीदार न्युज ) : – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने जयश्रीताई सुनील महाजन यांनी जळगाव शहरात महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काल दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जयश्रीताईंनी सदाशिव नगर, यमुना नगर, चौधरी वाडा, कोल्हे वाडा आणि अयोध्या नगर या भागांमध्ये भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या आजवरच्या कार्याचा आढावा सांगतांनाच परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

- Advertisement -

Jayashreetai Mahajan

यावेळी अनेक मतदारांनी शहरातील निकृष्ट रस्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जयश्रीताईंनी रस्त्यांच्या कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. महापौर म्हणून काम करताना नगरसेवकाच्या पक्षपातीपणापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्याच्या बळावर त्यांनी मतदारांना विश्वासाने मतदान करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

👉🏽 अबबब ईतकी गर्दी

जयश्रीताईंनी महिलांना विशेष आवाहन करतांना म्हटले, की “महिलांना नेतृत्वात आणण्याच्या दिशेने या निवडणूकीत महिलांची मोठी जबाबदारी आहे. महिलांनी एकत्र येऊन मला निवडून द्यावे, ही माझी अपेक्षा आहे.” शिक्षिका असल्यामुळे शिस्तबद्ध व कुशल कार्य करण्याची सवय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आणि जळगावला अग्रस्थानी नेण्यासाठी संधी मिळावी, अशी आशा व्यक्त केली.

शहरातील विविध मुद्द्यांवर बोलताना स्वामी समर्थ मठाच्या समस्येवर त्यांनी सक्रियतेने आंदोलन केल्याचा दाखला दिला. जळगाव ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून, येथे कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी मी नेहमीच सज्ज आहे, असे ठामपणे त्यांनी नमूद केले.

जयश्रीताईंनी तरुणांना आश्वासन देत म्हटले की, गावातील तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार आहे. मला संधी द्या, मी माझे शब्द नक्कीच पाळेल. या निवडणुकीने शहरात परिवर्तनासाठी महिलांचे नेतृत्व आणि तरुणांसाठी संधीचा नवा अध्याय खुला होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जयश्रीताईंसारखा आश्वासक महिला उमेदवार असल्याने जळगावातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS