साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | जगभरातील सोशल मिडीयावर अनेक फोटोसह व्हिडीओ व्हायरल होत असतात काही खरे असतात तर काही खोटे असता पण असाच एक फोटो दिसत आहे. तो खरा खुरा आहे चक्क कंपनीने चारचाकीच्या मार्केटीगसाठी वापरले आहे. ज्यामध्ये एकावर एक अशा सात कार रचल्या आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एकावर एक सहा कार रचल्याचा फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. ही एक मार्केटिंगची ट्रिक असून कंपनीनं गाड्यांच्या प्रचारासाठी असं केल्याचं समोर आलं आहे. हे समोर आलेलं प्रकरण चिनमधील आहे. चिनमधील कार उत्पादक कंपनी Chery ने eQ7 इलेक्ट्रिक क्रॉसओवर कार लॉन्च केलीय. याच्या मार्केटिंग साठी त्यांनी एक हटके आयडिया शोधून काढली. त्यांनी त्यांची कार किती टिकाऊ आहे हे दाखवण्यासाठी ही आयडिया वापरली. त्यांनी चक्क एकावर एक गाड्यांचा थरच लावला.
चीनमधील कार कंपनी चेरीने त्यांती नवी कार EQ7 गेल्या महिन्यात लॉन्च केली. पू्र्ण चार्ज केलेल्या बॅटरीवर या कारची ड्रायव्हिंग रेंज 412-512 किमी आहे. आपल्या स्पर्धकांमध्ये वेगळं दिसण्यासाठी कंपनीनं कारची हटके मार्केटिंग केली. कारची अॅल्युमीनिअम बॉडीमध्ये किती ताकद आहे हे दाखवून देण्यासाठी सात गाड्या एकावर एक रचल्या. दरम्यान, कारची मार्केटिंगचा हा स्टंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो काहीच वेळात इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला.