Tapi Irrigation Department V. D. Patil. जळगाव । सुनिल भोळे । सीएसआर फंड प्राप्त करून शेततळ्याचे कामे मिळवून देतो असा बनाव करून अजय भागवत बढे यांची ४५ रुपयात फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तापी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी.पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य ७ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजय बढे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचे शेततळ्याचे कामे करण्यात येत आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी निवृत्त वरिष्ठ अभियंता .व्ही.डी.पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय बढे यांना शेततळ्याचे कामे मिळवून देतो असे आमिष देवून ४५ लाख रुपये घेवून फसवणूक केली होती.
Tapi Irrigation Department V. D. Patil.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय बढे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक राजकुमार यांची भेट तक्रार केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी सदर तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. मात्र, या प्रकरणी फक्त दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे अजय बढे यांना कळविण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्णयाविरुद्ध अजय बढे यांनी जळगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती.न्यायालयाने सर्व पुरावे लक्षात घेवून व्ही. डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.मात्र,कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.या प्रकरणी अपर जिल्हा न्यायाधीश न्या.एस.आर.पवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. ची दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर अपर जिल्हा न्यायाधीश न्या. एस.आर.पवार यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णय कायम ठेवून निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामानंद नगर पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.परंतु आज जळगाव येथे न्यायालयाने व्ही. डी.पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे . त्यामुळे व्ही. डी.पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे .
Tapi Irrigation Department V. D. Patil
महसूल पथकाने केले पोलिसांचे काम परंतु साहेब म्हणतात आम्हाला माहीतच नाही
जुन्या वादातुन एकाला संपविले तर साथ जखमी केले