घराचे स्वप्न होणार साकार : ११ हजार घरांची होणार विक्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की स्वतःचं घर असावं. ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण प्रचंड मेहनत करतो. मात्र आज जमिनी आणि घरांच्या किमती गगनाला भिडताना दिसतायेत. यामुळेच प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नातील घर मिळत नाही. पण, आता अनेकांचे हे स्वप्न म्हाडाकडून पूर्ण होणार आहे. आता म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. ही माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलीआहे. अनेक दिवसांपासून म्हाडाच्या लॉटरीबाबत चर्चा होती. ती अशी पडून असलेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. विक्री न झालेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेतला जाईल. यानंतर किंमती घटवण्याचा निर्णय घेणार असल्याची माहितीही मंत्री सावे यांनी दिली आहे.

- Advertisement -

अनेक दिवसांपासून म्हाडाच्या लॉटरीत पडून असलेल्या घरांच्या किमती खाली येतील, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी म्हाडाच्या लॉटरीत घरांच्या किमती कमी होतील, असं अतुल सावे यांनी स्पष्ट केलं आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विक्री न झालेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेणार आहेत. या घरांच्या किमती कमी करून पुन्हा विक्री करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

म्हाडाच्या सुमारे ११ हजार घरांच्या किमती कमी होणार आहेत. संबंधित घरांची वीज बिले आणि पाणीपुरवठ्याची रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे म्हाडाने हा निर्णय घेतल्याचेही मंत्री सावे यांनी सांगितलं आहे. संबंधित घरांची वीजबिल आणि पाणीपुरवठा यामध्ये म्हाडा मोठा खर्च करते. अशा ११ घरांची कमी किंमतीत पुनर्विक्री होणार आहे. तोटा टाळून महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीमधील नागरिकांना याचा लाभ होईल. या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजनांतर्गत बांधण्यात आलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठीची चर्चा सुरु आहे. यासाठी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व प्रादेशिक विकास मंडळातर्फे २४ नोव्हेंबर २०२३ रोजीला आलेली संगणकीकृत सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीची नवीन तारीख संबंधित अर्जदारांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, असे मंडळाने कळविले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS