साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | देशातील अनेक तरुणांना देशसेवेत रुजू होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक तरुण मेहनत देखील करीत असतात. अशाच तरुणासाठी एक मोठी संधी आली आहे. सशस्त्र सीमा दल अंतर्गत उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत एकूण १११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला).
एकूण पद संख्या – १११
शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त संस्था/बोर्ड/विद्यापीठातून १०वी/१२वी/पदवी/डिप्लोमा/इंजीनियरिंग किंवा समकक्ष. शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत.
अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in
पगार – उपनिरीक्षक पदानुसार पगार ३५ हजार ४०० रुपये ते १ लाख १२ हजार ४०० रुपयांपर्यंत.