आमदार बच्चु कडू यांच्या प्रयत्नाने यावल नगरपालीकेच्या रखडलेल्या विकास कामांसाठी साडेसहा कोटीचा निधी मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल :- येथील शहरातील विविध भागातील रस्ते व विकास कामासाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ नगर पालिकेचे चे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे प्रयत्नाने व आमदार बच्चू कडू यांचे मंत्रालयात सततच्या झालेल्या पाठपुराव्याने नगर विकास मंत्रालयाकडून साडे सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आले आहे. यावल नगरपालीका कार्यक्षेत्रातील गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या विकास कामासाठी निधी मंजूर झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

- Advertisement -

शहरातील तारकेश्वर मंदिरा लगतची संरक्षण भिंत बांधणे ८० लक्ष रुपये , बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्त्याचे डांबरीकरण व कॉन्क्रीट दुभाजक बांधणे यासाठी एक कोटी रुपये , काय येथील व्यास नगर पांडुरंग सराफ नगर व स्वामी समर्थ नगर मधील रस्ते यांचे डांबरीकरण करणे एक कोटी रुपये आयशा नगर प्रभू लीला नगर स्वामीनारायण नगर या वस्त्यांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण तथा गटारीचे कॉंक्रिटीकरण करणे यासाठी एक कोटी ७० लाख रुपये, श्री गजानन महाराज मंदिर परिसर बाबा नगर एकरानगर रजा नगर रस्त्याचे डांबरीकरण व गटारीचे काँक्रिटीकरण करणे एक कोटी रुपये नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ७०९,७१०,व ७१२ मध्ये रस्ते डांबरीकरण व साईड गटारी बांधणे ५० लाख रुपये ,डांगपुरा कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे ५० लक्ष असे सहा कोटी ५० लाख रुपयांचा निधी शहरासाठी मिळाला आहे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही लवकरच लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असुन ही आचारसहींता लागणे आधी या निधीतील विकास कामे व्हावी
शहरातील क्षेत्र व विस्तारीत भागातील विविध वस्त्यामधील विकास कामासाठी निधी मंजूर झालेला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. लोकसभेच्या निवडणूकआधी शहरातील विकासकामे गतीने व्हावीत अशी अपेक्षा येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह यावल शहर वासीयांकडून व्यक्त केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS