महाराष्ट्र राज्य विज कामगार महासंघाची नूतन पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

उमरगा । सुरज आबाचने । धाराशिव मंडळ कार्यकारिणी , विभागीय कार्यकारिणी धाराशिव, तुळजापूर सन २०२५ ते २०२७ नूतन पदाधिकऱ्यांना प्रमुख मान्य वरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंद अयाचित, प्रमुख पाहुणे उंद्रे बापु, निवडणूक अधिकारी नारायण गडगडे ,लातूर परिमंडळ सचिव प्रवीण रत्नपारखी, परिमंडळ अध्यक्ष नवनाथ बडे,यांची उपस्थिती होती. यावेळी मान्य वरांच्या हस्ते विश्व कर्मा प्रतिमेचे पूजन करून प्रवीण रत्नपारखी यांनी श्रमिक गीत घेऊन,अनंतदास मंदिर येथे धाराशिव मंडल अंतर्गत कामगार महासंघाची मंडळ, विभागीय कार्यकारिणी यांचा प्रशासनासोबत परिचय व स्वागत करण्यात आले.व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपञ देऊन स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

या मध्ये धाराशिव मंडळ अध्यक्षपदी शाम आबाचने,उपाध्यक्ष विकास गाडेकर,सचिव निलेश भिरंगे,सहसचिव सातय्या स्वामी,रणजित मोटे,संघटनमंत्री शिवाजी दूधभाते,कोषाध्यक्ष जयकर कोळगे,प्रसिद्धी प्रमुख विनोद कुंभार, तसेच तुळजापूर विभागीय कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी अमोल पाटील, सचिवपदी मोहन गुरव,संघटनमंत्री अनिल कोल्हे, कोषाध्यक्ष आप्पाराव लवटे,प्रसिद्धीप्रमुख महमद लदाफ,धाराशिव विभागीय कार्यकारणीत अध्यक्षपदी दलूचंद बोंदर,सचिव उमाकांत जाधव,संघटन मंत्री विलास अहिरे,कोषाध्यक्ष सुनीता देवकर,प्रसिद्धी प्रमुख डी. बी.पवार या सर्वां नुतन पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यानंतर मनोगत व्यक्त केले आयचित यांनी संघटनेचा सुरुवातीच्या काळापासुन ते आजतागायतच्या प्रवासाचा सोबती असुन सुरुवातीचा संघर्ष व आजची महासंघाचा झालेला वटवृक्ष याबाबत अनेक प्रसंगाची आठवण करुन देत या सर्वांसोबत काम करता आल्याचे समाधानही व्यक्त केले. व हेच संस्कार सोबत घेऊन आपण पुढील वाटचाल कराल अशी अपेक्षा व्यक्त केली व पुढील वाटचालीस सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

तदनंतर .बी.जी.ऊंदरे बापु यांनी पुर्वी काम करताना संपर्काची साधने व महासंघाची पाहीलेली वाटचाल व भविष्यात येऊ घातलेले खाजगीकरणाचे संकट यावर भाष्य केले व ज्या ठीकाणी आपली ताकद कमी आहे, असे वाटतेय तीथे संपर्काच्या माध्यमातुन आपले पाय घट्ट रोवण्याचे आवाहन केले.

यावेळी धाराशिव मंडळातील महासंघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS