कृषी औद्योगिक संस्थेची रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक बिनविरोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Agro-Industrial Instituteसाक्षीदार न्यूज |जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,मंत्री संजय सावकारे,पदमश्री ॲड.उज्वल निकम,आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली.

- Advertisement -

सहकार व पणन क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील पहिली व सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली. यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा नविन आदर्श उभा केला आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे: रोहित निकम,संजीव मुकुंदराव पाटील,रमेश जगन्नाथ पाटील,यादवराव विष्णू पाटील,रामनाथ चिंधु पाटील,सुधाकर दौलतराव पाटील,मंगेश भरत पाटील,शांताराम चंद्रा सोनवणे,श्वेतांबरी रोहित निकम,सोनल संजय पवार,अरूण बाबुराव देशमुख,गजानन मल्हारराव देशमुख,प्रशांत लिलाधर चौधरी,विवेक राजाराम पाटील,अरविंद भगवान देशमुख,निळकंठ आनंदा नारखेडे,पुंडलीक दौलत पाटील,प्रताप हरी पाटील,अरूण आत्माराम पाटील यांची निवड झाली आहे.

- Advertisement -

…तीन जिल्हाध्यक्षांच्या माघार
जिल्ह्यात सहकारात एक आदर्श पायंडा पडला असुन सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणजेच भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज,राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी निंवडणुकीतून माघार घेत खऱ्या अर्थाने सहकारात राजकाराणाचे जोडे बाजुला सारून खऱ्या अर्थाने राजकीय मुस्सदेगिरी दाखवली.

….बॅरीस्टर निकमांचा वारसा यशस्वी
कृषी,औद्योगिक सहकारी संस्थेंचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी बॅरीस्टर देवराम माधवराव निकम यांचे नातु रोहित दिलीपराव निकम यांनी सहकारात यशस्वीतेकडे वाटचाल केली आहे. दिलीपराव निकम यांनी देखील सहकारात वर्चस्व सिध्द केले होते. शैलेजादेवी निकम या जिल्हा बॅंकेच्या संचालिका असुन सहकारातील केंद्र व राज्याची अनेक पदे त्यांनी भुषवली आहे.सहकाराचा वारसा समाजकारणाच्या माध्यमातून रोहित निकम हे पुढे नेत आहेत.

Agro-Industrial Institute

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS