ड्रग्जमाफिया ललित पाटीलला रुग्णालयात मदत करणारा कर्मचारी अटकेत !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्या ससून रुग्णालयातील मुक्त वास्तव्यासाठी पोलीस आणि रुग्णालयीन प्रशासनामधील दुवा असल्याच्या संशयावरून तेथील कर्मचारी महेंद्र अप्पा शेवते (४५, रा. बंडगार्डन, पुणे) याला पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून रुग्णालयीन प्रशासनातील काही ‘बड्या माशां’ची नावे पुढे येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे.

- Advertisement -

पाटील याने आजारी असल्याच्या बहाण्याने रुग्णालयात ठोकलेला मुक्काम, तेथे त्याची करण्यात आलेली शाही बडदास्त, रुग्णालयाजवळच्या तारांकित हॉटेलमध्ये पाटीलच्या सुरू असलेल्या लीला, रुग्णालयातून त्याने चालवलेले अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट आणि ते उघडकीस आल्यानंतर त्याने केलेले पलायन यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ससून रुग्णालय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलिसांसह सोळा जणांना अटक झाली. तीन अधिकाऱ्यांसह दहा पोलीस खात्यातून निलंबित झाले. यासंदर्भात आरोग्य प्रशासनाच्या सहभागाबाबत चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले. तर अन्य एका डॉक्टरला निलंबित करण्यात आले. त्याबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याचा महत्त्वाचा सहभाग पुढे आल्यानंतर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.

पाटील याला कारागृहातून महिनोन् महिने रुग्णालयात पाठवण्यात कारागृह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे. तपासांतर्गत प्राथमिक टप्यात पाटील याच्या थेट रॅकेटमधील साथीदारांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांवर कारवाई झाली. सध्या सुरू असलेल्या तपासामध्ये आरोग्य प्रशासनातील संशयितांबाबत माहिती संकलित केली जात आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS