रात्रभर सुरु होती चकमक : जवानांनी ५ दहशतवाद्यांना शोधून केले ठार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असतांना दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील समनू गावात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे सर्व दहशतवादी लश्कर-ए-तोयबा आणि टीआरएफशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी गुरुवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. कुलगामच्या नेहामा परिसरात शुक्रवारी पहाटे गोळीबार सुरू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना गुरुवारी या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी समनो गावाला सर्व बाजूंनी घेराव घातला. सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसर पिंजून काढला. सर्च ऑपरेशन अधिक वेगाने सुरू केले. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यांना जवानांनी प्रत्युत्तर दिले. ज्या ठिकाणी दहशतवादी लपून बसले होते, ते ठिकाण चहूबाजूने घेरले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत आतापर्यंत ५ दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळते.

जम्मू – काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसीजवळ मागील बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. एलओसीजवळ संशयास्पद हालचाली सुरू होत्या. सुरक्षा दलाच्या जवानांच्या ते निदर्शनास आले. त्यांनी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS