साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | देशभरात गेल्या काही महिन्यापासून टोमॅटोसह कांदेचे भाव वाढले असतांना आता सणासुदीच्या मुहूर्तावर डाळींच्या भाववाढीने सर्वसामान्यांचे हाल सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
डाळ स्वस्त दरात विकण्यासाठी सरकारने तयारी सुरू झाली आहे. अरहर, मूग आणि उडीद डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आता चणाडाळ विकण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना भारत दाल ब्रँड अंतर्गत 60 रुपये प्रति किलो दराने (चणा डाळ दर) चना डाळ मिळेल. देशभरातील 703 नाफेड स्टोअरमध्ये त्याची विक्री केली जाईल. हे NCCF, केंद्रीय भंडार आणि मदर डेअरीच्या सफाल रिटेल स्टोअरमध्ये देखील उपलब्ध असेल. आता बाजारात चणाडाळीचा दर 70 ते 80 रुपयांच्या दरम्यान आहे.
ग्राहकांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी अनुदानित चणाडाळ विक्रीला सुरुवात केली. भारत दल या ब्रँड नावाखाली चणा डाळ एक किलो पॅकसाठी 60 रुपये प्रति किलो आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो या दराने विक्री सुरू झाली आहे. सरकारी चणा साठ्याचे चणा डाळीत रूपांतर करून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने 17.07.2023 रोजी 1 किलो पॅकसाठी प्रति किलो 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो या अत्यंत अनुदानित दराने 17.07.2023 रोजी भारत डाळ ब्रँड अंतर्गत किरकोळ पॅकमध्ये चणा डाळ विक्री सुरू केली. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून भारत डाळीचे वितरण केले जात आहे. या व्यवस्थेअंतर्गत चणा डाळ राज्य सरकारांना त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलीस, तुरुंग, तसेच राज्य सरकार नियंत्रित सहकारी संस्था आणि महामंडळांच्या किरकोळ दुकानांमधून वितरणासाठी उपलब्ध करून दिली जाते.